Thursday, 29 September 2011

कशी वचने दिली होतीस

कशी वचने दिली होतीस ,
कशी जपत आहेस ?
शब्द शब्दाने मला घायाळ करीत आहेस ,
क्षणोक्षणी माझा अंत बघत आहेस .
तू तर मला तारणार होतास ,
मग वाहत्या पाण्यात सोडून कसा गेलास ,
आपल्या वचनाला विसरून कसा गेलास ????????

चांदण्याच्या थंडाव्यात ,
माझ्या केसांची उब घ्यायचास तू ,
तिथेच आयुष्यभर राहावे ,
असा म्हणायचास तू ,
त्याच केसांना आगीत झोकून कसा गेलास ,
आपल्या वचनाला विसरून कसा गेलास ????????

लहान सहान गोष्टींवर माझे रुसणे ,
कधी मुद्दामहून तुला सतावणे ,
अन तुझे कधीच तिटकारा न करणे ,
कान पकडून आपले माझी मनधरणी करणे ,
........................................................
कश्या त्या आठवणी , मला एकटे सोडतच नाही ,
कसा तू , माझ्या वाट्याला आता येतच नाहीस ,
असा तू मला अश्रूंच्या पुरात सोडून गेलास ,
आपल्या वचनाला विसरून कसा गेलास ????????
अशी तुझी वचने , अशी तू जपली 
माझ्या प्रत्येक स्वप्नाला ती रडवून गेली ............


कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment