Wednesday, 28 September 2011

आई जगदंबेची आठवण झाली

आई जगदंबेची आठवण आज झाली ,
तिच्यासाठी जोगवा गायची इच्छा झाली ,
म्हणोनी भेटीसाठी तिच्या ,
आज पाहाटी कोराडी जाती झाली ,
एरवी चाली दोन पावले तरी कंटाळा येई ,
कशी न जाने दर्शनाची ओढ होती मनात ,
पाच किलोमीटर पायी चालली ,
पण डोळ्यात चमक तशीच होती ,
तिच्या भक्तीचीच किमया सारी ,
भाविकांचा उमडला होता पूर ,
नव्हते मी एकटी , 
सारी भाविक मंडळीच आतुर होती,
तिला बघण्यासाठी ,
गजर करीत तिच्या नामाचा ,
आमची श्रद्धा तिचे गोडवे गात होती ,
दिसताच तिचे रूप स्वयंभू ,
माझी पारणं फिटली .........

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment