Monday, 26 September 2011

माझं जीवन

माझं जीवन म्हणजे एक उघडं पुस्तक आहे ,
पुस्तकाच्या प्रत्येक पानात एक रहस्य दडलेलं आहे ,
प्रत्येक रहस्य मला उलगडलेलं आहे ,
उलगडलेल्या रहस्यात माझं मन हरवलेलं आहे ,
हरवलेल्या मनाला वास्तवाचं भान आहे ,
त्या वास्तवात माझं अनेकांवर प्रेम बसलेलं आहे ,
त्या प्रेमात माझं वाहून जाणं ,
वाहतांनाही किनाऱ्याला माझ्या न विसरणं ,
किनाऱ्यावर कुणाचं तरी स्वप्न पाहणं ,
स्वप्नात एक घरटे बांधणं ,
त्या घरट्यात सुख दुखाचा खेळ मांडणं ,
त्या मांडणी वरून माझ्यावर अनेकांनी प्रेम करणं ,
त्या प्रेमाला माझं स्वीकारणं ,
त्याचा आदर करणं ,
त्याची काळजी घेणं ,
कारण जरी म्हणत असले सर्व ,
कि प्रेम हे एकदाच होते , परत परत नाही 
तरीही , जेव्हापर्यंत खरं प्रेम भेटत नाही 
मन त्याच्या शोधात इकडून तिकडे भरकटत असतं............. 

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment