Sunday, 25 September 2011

बघवतही नाही बोलवतही नाही

बघवतही नाही , बोलवतही नाही ,
हे असे का ? विचारण्याचा जोरहि नाही ,
माहित असतं सर्व चाललाय खेळ बनवा बनविचा ,
पण आवाज उठवण्याची हिम्मतही नाही .
कि आपणच करीत नाही ?
बहुतेक आपल्याला कुणी ती शिकवणच दिली नाही ,
त्या संस्काराचा वारसा आपल्याला मिळाला नाही ,
पण म्हणून काय झाले ,
सर्वच काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मत नाहीत ,
किंवा सर्वच घराणेशाहीच्या नावावर लढत नाहीत ,
अशा व्यक्तींच्या उदाहरनांचीही कमी नाही ,
इतिहासिक नाही आताचेच बघा ,
किरण बेदी , अण्णा हजारे अन केजरीवाल ,
यांना आपण काय म्हणावे ,
तेही आपल्यातील एकच ,
आपल्याच सारखे जगणारे ,
तरीही वेगळे भासणारे ,
आदर्श ठेवावे असे व्यक्तिमत्व असणारे ,
कारण त्यांनी हिम्मत केली ,
आपल्या शब्दावर अटल राहण्याची ,
ठरवलेले कार्य जिद्दीने पूर्ण करण्याची ........


कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment