Thursday, 22 September 2011

पिंजलेले आयुष्य

पिंजलेले आयुष्य कधी पर्यंत जगायचे ?

इतरांच्या सुखासाठी किती दुखं झेलायचे ?

कुणाला जगवातांना आपण किती मरायचे ?

मरून पडून पुन्हा जिवंत होऊन उठायचे ,

कर्तव्याच्या नावावर किती झटायचे ?

मायाजाळ म्हणून त्यात किती गुंतायचे ?

आपली स्वप्न भंगवून आनंदी कसे राहायचे ?

केव्हा पर्यंत उबगलेल्या नात्यांना टिकवायचे ?

त्यासाठी नकळत सर्वांना ताणून धरायचे ?

आपला स्वार्थ विसरून कुठपर्यंत चालायचे ?

ह्या सर्वात आपण किती झिजायचे ?

उद्या मी फक्त तुझ्यासाठीच जगेल ,

असे आश्वासन स्व मनाला केव्हापर्यंत द्यायचे ?

किती हे प्रश्न , कसे हे प्रश्न ?

ह्या प्रश्नांना कवटाळून किती रडायचे ?

डोळे सुजले तरी अश्रू गाळत बसायचे ............


अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment