Tuesday, 20 September 2011

चाफ्याची कळी

चाफ्याची कळी आज माळली कुणी ,
गंध घुमे वाऱ्यावरी अन भिडे अंतर्मनी ,
श्वास हुंगून घेती तो सुगंध पुरता ,
आपोआप होती डोळे हि बंद ,
अन पापण्या मिटताच ,
काय सांगू होई काय माझी दशा ,
असे वाटे सखे जसे तू असशी समोर ,
अशी हसतेय जशी ,
चांदणी लुकलुकती आकाशी ,
मज लावती वेड  ,
तुझी खट्याळ एक लट ,
वाटे त्या लाटेला पकडावे हातात ,
मी होता पुढे , तू फिरशी मागे 
अन लट न येता ,
येई हाती चाफेकळी एक नाजूक ,
अशी तू मज सुगंधात सोडून जातेस ,
कुणी माळता चाफा ,
तूच तू आठवी ग !!!!!!


कवयित्री - अर्चना सोनाग्रे

2 comments: