Wednesday, 14 September 2011

तुझेच गीत गाते मी

क्षणो क्षणी , मनोमनी तुझेच गीत गाते मी ,
कळत नाही कशी सख्या ,
तुझ्यात इतकी गुंतते मी ,
क्षणो क्षणी , मनोमनी तुझेच गीत गाते मी ,

कधी चातकाची सोबतीण असते मी ,
आधी ओसाड माळरान असते मी ,
तुझ्या आठवणीत न जाने काय काय बनते मी ,
कळत नाही कशी सख्या ,
तुझ्यात इतकी गुंतते मी ,

एकटीच एकटी असले तरी ,
कुणाकुणाशी गप्पा मारते मी ,
अन प्रत्येक शब्दात जणू तुझेच बोल बोलते मी ,
कळत नाही कशी सख्या ,
तुझ्यात इतकी गुंतते मी ,

पाऊसधारांना झेलते मी ,
मोरापारी नाचते मी ,
कधी त्या पावसाची , कधी त्या मोराची 
आठवणीत तुझ्या प्रत्येक क्षणाची ऋणी होते मी ,
कळत नाही कशी सख्या ,
तुझ्यात इतकी गुंतते मी ,

पाणावलेल्या डोळ्यांना आरशात निरखत बसते मी ,
एकेका अश्रूला कितीतरी जपते मी ,
भीती वाटते त्या अश्रुंसोबत तुझे प्रतिबिंब ना वाहून जावे ,
म्हणून त्या अश्रूंनाही तात्काळात ठेवते मी ,
कळत नाही कशी सख्या ,
तुझ्यात इतकी गुंतते मी ,

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment