Sunday, 17 July 2011

पहिल्या नजरेचा नजराना !

आजही  आठवते ती ! वयाच्या १४ व्या वर्षातून १५ व्या वर्षात नुकतेच पदार्पण केलेली ती म्हणजे अपूर्वा . नवनवीन ठिकाणी फिरायची तिला भारी हौस . म्हणुन तर दहाविचे वर्ष असतांना सुध्धा , जराही विचार न करता बाबांनी ' फिरायला जायचे का?' असे विचारताच ती तयार झाली . मग काय ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अभ्यासात जाणार होत्या , त्या महाराष्ट्र दर्शनासाठी बुक झाल्या . 
महाराष्ट्र दर्शनात त्यांनी सर्वात आधी नाशिक कडिल भाग , म्हणजे शिर्डी ,शनि शिन्गनापुर , सप्तश्रींगी देवी व त्रम्ब्यकेश्वर बघायचे ठरवले .ज्या दिवशी ही मंडळी त्रम्ब्यकेश्वरला गेली तो दिवस योगा योगाने सोमवार निघाला . झाले ! त्रम्ब्यकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक ज्योतिर्लिंग , त्यात हा दिवस सोमवार असल्याने भाविकांची खुप गर्दी जमली होती. पण इतक्या दूर आल्यावर शिवलिंगाचे दर्शन न घेता परत जाने अपुर्वाला आणि तिच्या आई बाबांना काही रुचले नव्हते . तेव्हा ते इतर भाविकांसोबत रांगेत उभे राहले . तिच्या मागेच मी पण उभी होती . वेळ जावा म्हणुन मी तिची चौकशी केलि . आम्ही बोलतच होतो तोच एक तरुण [ १९ ते २० वर्ष वयाचा ] आमच्या जवळ आला . बिचारा खुप घाईत दिसत होता . 
'' excuse me .'' तो तरुण म्हणाला . आम्ही दोघिंनी त्याच्याकडे पलटून बघितले असता माझ्या लक्षात आले कि तो फ़क्त किशोरवयीन अपुर्वालाच बघत होता आणि ती पण . तिची आणि त्याची नजर एकमेकां वरून हलतच नव्हती . मी तिला धक्का मारणार होती पण त्या आधी त्या तरुनालाच कुणाचा तरी धक्का लागला आणि तो भानावर आल्याने ही सुध्धा सावरली . आपल्या हातातली फुलांची परडी पुढे करीत  तो म्हणाला ,''आमचे [ त्याच्यासोबत आणखी मंडळी पण होती . दोन मुली आणि एक बॉय कट केलेली वयस्क बाई .] मुंबईला जाण्यासाठी ५ वाजताच्या रेलवेचे reservation झालेले आहे . आता ४-४५ झाले आहेत . तेव्हा आम्हाला निघायलाच हवे . आपण प्लीज़ ही परडीतिल फुल माझ्या कडून महादेवांच्या चरणी अर्पण कराल ? प्लीज़ .......'' 
'' हो '' अपूर्वाच्या तोंडातून अजानपने हो निघाले . हो ऐकताच त्याने आपल्या परडीतिल सर्व फुल तिच्या परडित टाकली. अपूर्वा त्याच्याकडे बघतच राहली . तिची ती नजर जणू म्हणत होती ,
'' एक नजर देउनि गेला ,
  ह्रदय माझे घेउनी गेला,
  दिली फुले मज परी,
  सुगंध तो लेउनी गेला , 
  नाव - गाव मज काय ठाऊक ,
  तरी प्रियतम तो माझा झाला .''

 आम्हा दोघींची छान गट्टी जमली होती . मी तिचा पत्ता व फोन नंबर लिहून घेतला होता . पण संपर्क साधायाची वेळ कधी आली नव्हती . आणि आज तब्बल ९ - १० वर्षांनी लग्न होउन नेहमी साठी माहेर सोडून जायची वेळ आली तेव्हा मी माझी अलमारी साफ करीत असतांना एका चिटोऱ्यावर लिहिलेले तिचे नाव आणि घरचा फोन नंबर दिसला . एकदम त्या तरुणाची आठवन झाली . मनात एकच काहुर माजले ,'' तो तिला पुन्हा भेटला असेल का ? .'' पंधरा दिवसातच विदेशी रहायला जाणार मी . मग कुठे मला अशा उचापती करता येतील ? म्हणुन म्हटले एकदा तिच्याशी बोलुनच घ्यावे . मनात अनेक प्रश्न आले , जसे ती आता २४ वर्षांची असेलच मग तिचे लग्न झाले असेल का ? तिचा नंबर तोच असेल का ? ते तर फ़क्त किशोरवयीन आकर्षण होते . ती अजुनही तिथेच गुरफटलेली असेल की विसरली असेल त्याला आणि तो ? त्याचे तर नाव सुध्धा माहित नाही , पण त्रम्ब्यकेश्वर नंतर दुसरयाच दिवशी अपूर्वाही मुंबईला जाणार होती , तिथे तो तिला भेटला असेल का ? बापरे किती प्रश्न पडले होते मला ! तेव्हा ठरवले एकदा फोन करून बोलुनच घेते . नशिबात असेल तर तिचा नंबर अजुनही तोच असेल . 
मी नंबर डायल केला , रिंग गेली तशी माझी उत्सुकता अधिकच वाढली . पलीकडून एका तरुण मुलीचा आवाज आला ,
'' hallo .'' तोच आवाज मी मनाशी म्हटले ही तीच असेल नक्की ...
'' अपूर्वा आहे का ?'' मी विचारले .
'' हो मीच अपूर्वा , आपण कोण ?'' तिने विचारले . मला खुप आनंद झाला . मी तिला त्रम्ब्यकेश्वरची आठवण करून दिली . तेव्हा तिलाही अगदी गदगदून आले . दोघिंनी एकमेकिंची छान विचारपूस केलि . मला अश्या बोलण्यात समाधान नव्हते वाटत . पण काय करणार , प्रत्यक्ष्य भेटने आता शक्य नव्हते . १५ दिवसात मला २ महीने पुरतील इतकी काम पार पाडायाची होती . पण विदेशी जायच्या आधी तिची भेट जरुरी होती ; म्हणुन मी तिला लग्नात यायचे आमंत्रण दिले . पत्रिकेची एक कॉपी तिला इ मेल केलि . ती सुध्धा हो भरली . मग काय वाट होती फ़क्त तिच्या येण्याची . आणि बरोबर माझ्या मेहंदीच्या रात्रि ती घरी आली . आम्ही परत इकडल्या तिकड़ल्या खुप गप्पा मारल्या , मेहंदी लावणे होताच मी तिला एकांतात घेउन गेली आणि मला पडलेला यक्ष्य प्रश्न विचारून टाकला,
'' त्याची पुन्हा भेट झाली का ?'' 
तिने नकारार्थी मान हलवली . तिचा चेहरा पडला . त्यावरून ओसंडून वाहणारे हास्य लोप पावले . मला वाटले मी उगाच तिला त्याच्याविषयी विचारले . मी तिला सॉरी म्हटले .आणि विषय बदलन्याचा प्रयत्न केला पण तिच्या वाहनाऱ्या डोळ्यांनी मला चुप केले . 
'' ताई तो मला पुन्हा कधीच भेटणार नाही का ग ?''
'' म्हणजे तु अजुनही त्याची वाट बघतेस ? अपूर्वा ९ -१० वर्ष झालीत ...........''
'' पण मी तर तिथेच आहे ना ...'' आपले अश्रु पुसून ती पुन्हा बोलू लागली ,'' महाराष्ट्र दर्शन आटोपून घरी जाई पर्यंत मला असेच वाटत होते की मला फ़क्त आकर्षण झाले आहे त्या नजरेचे , दुसरे काहीच नाही . पण जस जसे दिवस गेले तसतशी आतुरता अधिकच वाढतेय . जिथे जाइल तिथे फ़क्त त्या नजरेचाच शोध असतो मला . मला वाटते मला पहिल्या नजरेतच प्रेम झालेय .''
'' अपूर्वा ९ वर्ष झालीत त्या मुलाची एक झलक मिळाली नाही तुला . आता कुठे शोधशील तु त्याला ?''
'' तुम्ही भेटल्या ना परत ९ वर्षांनी , मग तो पण भेटेलच ना कुठेतरी .''
'' अपूर्वा तुला कसे समजावू ? ''
'' काहीच समजावू नका ताई . तुम्ही माझ्यासाठी दुखी नका होऊ . खुश राहा . रात्र खुप झालीय . झोपुया आता .''
इतके म्हणुन तिने डोळे मिटून घेतले . तिचे काय होइल या विचारत मला कधी झोप लागली माहित नाही . पुन्हा मला तिच्याशी बोलायला एकांत मिळालाच नाही . माझ्या डोक्यावर अक्षता टाकुन ती आपल्या गावी परत गेली . पण जेव्हा केव्हा मी एकांतात असते माझ्या मनात तिची अपूर्वाई घोळत असते . तिच्या त्या प्रेमाचा अंत काय होइल ? ९ वर्षानंतर समजा तो तरुण तिला भेटला तरी ती त्याला कशी ओळखनार ? देवाला माहित .
कदाचित यालाच म्हणतात पहिल्या नजरेचा नजराना ........


लेखिका अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment