मुंबई १३-७-२०११

काल रात्री साडे आठ वाजता बाबा कामावरून घरी आले . घरी येताच बातम्या बघणे हे त्यांचे नेहमीचेच . पण काल त्यांचा चेहरा जरा चिंतेत भासला . मी कारण विचारले तेव्हा माहित पडले कि मुंबईत आणखी तीन बॉम्ब स्फोट लागोपाठ , दहा मिनिटांच्या आत झाले . टि व्ही लाऊन बातम्यांमध्ये उध्वस्त दादरहि बघितले . पण जे झाले त्याचे मला मुळीच आश्चर्य वाटले नाही किंवा किंचितही काळजीची रेखा माझ्या चेहऱ्यावर उमटली नाही .कारण हे सर्व मला तरी अपेक्षितच होते . हो होतेच मला अपेक्षित ! आणि का अशी अपेक्षा करणार नाही मी ? सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला जे थरार नाट्य झाले . त्याच्या पुढे हे तीन बॉम्ब स्फोट काहीच नाहीत . आपल्या देशाची प्रतिमा काळवंडली गेली त्या दिवशी .  सुरक्ष्या व्यवस्थेच्या चिंध्या चिंध्या उडवल्या गेल्या . ताज हॉटेल , ओबेरॉय हॉटेल हि दोनही किती नामांकित हॉटेल्स मुंबईची . देश विदेशातील महत्वाची मंडळी ह्याच हॉटेल्स मध्ये विसावा घेतात हे लक्षात घेऊन आतंक वाद्यांनी तो सर्व प्रकार घडवून आणला होता . पण इतके होऊनही आपली सरकार किंवा आपण त्यातून काहीच शिकलो नाही . ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे काल झालेले स्फोट . २६-११-२००८ नन्तर काही दिवस , महिने कडक सुरक्षा व्यवस्थेत सर्व कामं होऊ लागलीत . अन काही दिवसातच आता शत्रू काहीच करणार नाही म्हणून आपण हवाल दिल झालो अन बघा शत्रूने कसा वर केला ते . अरे दोन वर्ष पूर्वीच्या त्या एकाच घटनेचा निकाल लागला नाही अजून . मग काल झाले त्याचा निकाल लागण्याची अपेक्षा ना करणेच बरे . आणि हि तर सुरवातच आहे . जर आपल्या सरकारनी आता काही ठोस पावलं नाही उचललीत तर मुंबई अरबी समुद्रात विलीन व्हायला वेळ लागणार नाही . आणि आपण सर्वच जाणतोय कि मुंबई आपल्या देश साठी किती महत्वाची आहे ते . तरी सुध्दा सुरक्षा व्यवस्थेत अशी धीरंगाई होणे हि चिंतेचीच बाब म्हणावी लागेल ना . पण जाऊ द्या आपण छान जगुन घेऊ . जेव्हा आपले हात ह्या आतंक वाद्यांनी लावलेल्या आगीत भाजतील तेव्हा बघू काय करायचे ते . बाकी आपली सरकार जिंदाबाद . हेमंत करकरे , अशोक कामटे अशी होनहार पोलीस क्षेत्रातली माणसं गमावलीत आपण २६-११-२००८ च्या त्या घटनेत , अन कितीतरी जवान आपल्या प्राणांना मुक्लेत . पण आजही सारेकाही जैसे थे च आहे . इतिहास पुन्हा आपली पुनरावृत्ती करू पाहतोय . काय वाटतं आपल्याला ? हि आपली मायाळू सरकार , अहिंसेची वारकरी सरकार हे थांबवू शकेल ? २६-११-२००८ ला इतके काही होऊनही काय केले आपण ? कसाबला ताब्यात घेऊन , मस्त पाहुणचार देतोय त्याला रोजचा . काल तर म्हणे त्याचा वाढदिवस होता . मुंबईतील बॉम्ब स्फोट म्हणजे त्याच्या मित्रांनी वाढदिवसाची त्याला दिलेली सप्रेम भेट असेच म्हणावे लागेल .

लेखिका - अर्चना सोनाग्रे

Comments

Popular Posts