Wednesday, 6 July 2011

प्रेयसी

ती एकटीच एकटी , स्वतःशीच हसते,
पावसाच्या सरीत मोरापरी नाचते ,
पाहताच मला , जिच्या हृदयाची धड धड वाढते ,
ओठांची मिटते कळी , झुकते डोळ्यांची पापणी ,
हरवलेली असते सदा न कदा जी माझ्याच विचारात ,
बघून आकाशाकडे न जाने काय करते ,
गनती करते चांदण्यांची कि मोजते दुराव्याचे क्षण ,
आवाज ऐकते माझा , जशी मधुर गझल ,
प्रत्येक अदा जिची काहीतरी नवीन सांगते ,
ती माझी प्रेयसी ...............


कवयित्री - अर्चना सोनाग्रे 

No comments:

Post a Comment