कधी कधी ओठांवर खूप काही येतं .

कधी कधी ओठांवर खूप काही येतं .
मनातील कप्प्यात कुठे तरी जावून बसतं .
आठवणींनी त्या नाजुकपणा येतो ,
काहीही असो मोहक लाजवल्या जातं .
माल हे सारं खूप गोड वाटतं .
तरीही मनातील गोष्टींना मनातच ठेवावसं वाटतं .
कुणाची नजर लागेल म्हणून सारखं मन भीतं .
कधी कधी असंच होतं , कारण नसतांना हसू येतं .
खूप खूप नाचावसं वाटतं ,
फुलपाखरू बनून उडावेसे वाटतं .
उगाच खट्याळपणा करावसं वाटतं .
आईला जाऊन बिलगावेसे वाटतं .
वातावरण कसं आनंदी आनंदी होतं .
तेव्हा शब्दांना कवितेत पिळावेसे वाटतं .
त्यांची माळ बनवून , तुला अर्पण करावी असं वाटतं .
कधी कधी मन असंच लहरी बनतं , 
येऊन जाऊन तुझाच विषय काढतं .
कधी कधी ओठांवर खूप काही येतं .
मनातील कप्प्यात कुठे तरी जावून बसतं .

कवयित्री - अर्चना सोनाग्रे 

Comments

Popular Posts