पाऊस आणि मी !

तसं पावसाचं आणि माझं भांडण खूप जुनं ,

म्हणायला नाही आमच्यात शत्रुता ,

पण मित्रत्वाची खूनही कुठेच नाही ,

मी मोकळ्या रानात जाऊन म्हणते ,

'' चल मनसोक्त भिजव आता .''

अन तो तेव्हाच होतो असा गायब ,

जसा थकून जातो विसाव्याला .

मग मी चिढ चिढ चीढते ,

शिव्यांनी त्याला आंघोळ घालते ,

पण तो निर्लज्ज असा ......

पुन्हा आपले तेच करतो ,

मन नसतांना माझे , चिंब ओले करून सोडतो !

पण आज अवचितच घडले , 

धोधो तो बरसू लागला ........

हातात पुस्तकं , 

छत्रीचा पत्ता नाही , 

ना दिसे आडोसा कुठे मला ,
म्हणून मी चालतच राहिली ,

हे बघून त्याला जणू कीव आली ,
मी थांबत नाही हे पाहून , तो स्वतःच थांबला !

मनात प्रेमळ भाव जागृत झाला .

आज मला त्याचा खूप लाड आला ,

आश्च्यर्याचा मला धक्काच बसला ,  

असा कसा तो समंजस झाला ?

मी पाउल ठेवताच घरात ,

तो पुन्हा धो धो बरसू लागला ...................................


कवयित्री - अर्चना सोनाग्रे 

Comments

Popular Posts