Monday, 11 July 2011

देल्ही बेल्ली


' भाग डी के बोस , स्वीटी स्वीटी स्वीटी तेरा प्यार चाहिदा , तेरे प्यार ने कर दिया दिवाना , जा चुदैल आणि नकद वाले डिस्को ' हि गाणी ऐकली आणि कधीही पिक्चर बद्दल उत्साहित नसणारी मी , देलही बेल्ली बघायला मोठ्या उत्साहात गेली . कारण एकतर गाणी वेगळीच , जगावेगळी . त्यात प्रस्तुती अमीर खानची , म्हणजे कथेत काहीतरी नाविन्य असेल , असे मला वाटले होते . पण पिक्चर बघितला अन माझा सारा उत्साह धुळीत मिसळला . समोरच्या बाकावर बसलेल्या किशोर वयातील मुला मुलींना बघून मला खूप वाईट वाटले . कारण त्या पिक्चर मधून नक्की काय [ चांगले ] घेतले पाहिजे हे समजण्याची त्यांची कुवत दिसत नव्हती . जे आई वडील मुलांना सोबत घेऊन हा पिक्चर बघायला आलेले होते त्यांची परिस्थिती तेच जाणो . पिक्चर चे संगीत , पटकथा , दिग्दर्शन , सर्वच छान होते . पण चरित्रांचे संवाद श्रवणीय नव्हते . पिक्चर सुरु झाल्या पासून तो संपे पर्यंत मी हसतच होते . पण तरीही सारेच मनात कुठेतरी खुपले . [ माझा प्रिय ] आमीर खान असे काही दाखवेल असे वाटले नव्हते . पण त्याला तरी काय दोष देणार म्हणा . त्याने तेच विकले , ज्याची बाजारात मागणी आहे .

लेखिका अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment