Wednesday, 6 July 2011

आज खूप दिवसांनी कुणीतरी भेटले

आज खूप दिवसांनी कुणीतरी भेटले ,
हृदयाच्या एक कप्प्यात जागा करून बसले ,
माझ्या भावनांना आधार देणारे मन जसे मला मिळाले ,
नामात नाम , राम नाम अशा एका भोळ्या रामाशी ,
माझे सुंदर नाते जुळले ,
ज्याला आम्ही मैत्रीच्या नात्यात विणले ,
भाऊ बहिणीच्या बांधिलकीने जपले ,
सावळेशे रूप , तरी गोजिरवाणे भासले ,

लेखिका 
अर्चना सोनाग्रे 

1 comment:

  1. आयुष्याच्या वाटेवर कधी कधी काही नाती न सांगताच बनून जातात . आपण पुन्हा भेटू कि नाही हे माहित नसतांनाही एक ओढ लाऊन जातात . असेच आमचे रामभाऊ . एकाच भेटीत भाऊ बहिणीचे नाते जोडून गेले . त्यांच्या साठीच हि कविता .

    ReplyDelete