Thursday, 7 July 2011

नातं

जेव्हा एका अनोळखी मुलाचे आणि मुलीचे ठरवून लग्न केले जाते , तेव्हा आधी ते ना एकमेकांना कधी भेटलेले असतात , ना हि त्यांनी एकमेकांना आधी बघितले असते . अचानक घरची मंडळी सर्व गोष्टी ठरवतात आणि ह्या दोघांना फक्त द्यायचा असतो तो लग्नाला होकार किंवा नकार . दोन्ही कडून होकार  कळताच लग्नाची तयारी सुरु होते अन दोन जीवांची धड धड सुद्धा . एकमेकांना जाणून घ्यायला दोघेही धडपडत असतात . जसजसे दिवस जातात ते दोन अनोळखी जीव एकमेकांच्या इतके ओळखीचे होतात कि त्यांनाही नावालाच वाटतं .बोलता बोलता कसे ते एकमेकांत गुंततात ह्याची चाहूल पण त्यांना लागत नाही . दोघांच्या हि दोन वेगवेगळ्या वाटा एक होतात आणि ठरवून केलेले लग्न प्रेम विवाहाचे रूप घ्यायला लागतं . माझ्या खालील कवितेत अशाच लग्न ठरलेल्या दोन जीवांच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे . जे आपल्याला , आपलेसेच वाटेल .

आपल्या ह्या नात्याची वाटच अशी आहे ,
चालता चालता हृदये गुंतती एकमेकांत ,
हि चालच अशी आहे .
किती हा दुरावा आपल्यात आहे .
परी अंतराचं  कुणाला भान आहे .
अनोळखी आपण अनोळखी आपली विश्वे ,
तरीही हि जवळीक का आहे ?
वाटतंय जसं हृदयाला मन मिळालंय,
प्राण हीन शरीराला आत्मा मिळालाय .
जे जे पाहिजे होते , तेते सारेच मिळालंय ,
देवावर ठेवलेल्या श्रद्धेच फळ मिळालंय .
आणखी काय बोलू आपल्या या नात्याबद्दल ,
माझे शब्द अपुरे पडत आहेत .....

कवयित्री - अर्चना सोनाग्रे 

No comments:

Post a Comment