Monday, 22 August 2011

अन्ना........!

जेवणाचे ताट हातात येताच ,
चेहरा आपला समोर येतो ,
प्रत्येक घासा बरोबर ,
आपलाच विचार मनात येतो .
किती हि सहनशीलता आपली ,
किती हे मनोबल आपले ,
मनावरही आपण मिळवलाय ताबा ,
शरीराला आपण लावलेय योग्य वळण ,
भगवे कपडे परिधान नाही केले तर काय ,
गुणाने आपण योगी पुरुष आहात ,
कर्तुत्वाने आपण युगपुरुष आहात ,
अहिंसेच्या पायी चालता आपण , 
नम्रतेने आपल्या चकित झालोय आम्ही ,
तरीही काही लोकांना अक्कल नाही आली ,
ते आपली हेकी हाकतच आहेत ,
आपला सूर ताणून धरताहेत ,
पण आपण आपले कर्म सोडले नाही ,
मोडेन पण वाकणार नाही ,
हा नारा सोडला नाहीत ,
खरच आम्ही भाग्यवंत ,
आपण लाभला आम्हाला ,
हे आमचं पुण्य ,
हि पुण्याई आम्ही वाया जाऊ देणार नाही ,
आपली संगत सोडणार नाही .............

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment