Saturday, 20 August 2011

आदरांजली अन्नांच्या चरणी


भाग - दुसरा 

आत्मविश्वासाचा खळखळ वाहणारा झरा आपण ,
एक नवा काळ घेऊन आलात आपण ,
पुनर्जन्म झाल्यासारखे वाटतेय ,
हरवलेले माणूसपण गवसल्यासारखे वाटतेय ,
इंडिया अन भारत , ह्या एकाच देशातील ,
दोन वेगळ्या जगात वावरणाऱ्या आम्हाला एकत्र आणले आपण .
जाती धर्माच्या नावावर विखुरलेल्या आम्हाला ,
संघटीत केले आपण ,
वाटत होते इथे सर्व बेपार्वाह आहेत ,
आपापल्यातच अखंड दंग आहेत ,
पण आपण माझ्या विचारांना नवीन दिशा दिली ,
मला माणुसकीची शिकवण दिली ,
आपल्यामुळे आम्ही जागरूक झालो ,
देशाप्रतीची कर्तव्य आम्ही जानलो ,

No comments:

Post a Comment