Tuesday, 8 November 2011

आजकाल सुंदर दिसावसं वाटतं

आजकाल सुंदर दिसावसं वाटतं ,
तासनतास आरशात स्वताला न्याहाळावसं वाटतं ,
केसांसोबत उगाच खेळावसं वाटतं ,
छान छान कपडे घालून फिरावसं वाटतं ,
आजकाल सुंदर दिसावसं वाटतं ...
काही नजरा आपल्यावरहि थांबाव्या असं वाटतं ,
चार चौघात आपणही भाव खाऊन जावसं वाटतं ,
मैत्रीणीत आपणही उठून दिसावसं वाटतं ,
आजकाल सुंदर दिसावसं वाटतं ...
पाऊस धारांना झेलावासं वाटतं ,
मन भरून हसावसं वाटतं ,
तुझी खट्याळ नजर मिळवावसं वाटतं ,
 आजकाल सुंदर दिसावसं वाटतं ...


कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment