कधी कधी

खालील कविता 'युवा वार्ता ','संगमनेर' च्या दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध झाली आहे .

कधी कधी वाटतं तुला खूप ठोकून काढावं ,
कधी कधी वाटतं तुला खूप ठोकून काढावं ,
ठोकून ठाकुन तुला आपल्या हृदयात भर्ती करून घ्यावं ,
अन स्वतःच बनून नर्स तुझी खूप सेवा करावी ,
स्वतःच करून जखमी स्वतःच उपचार करावं,
कधी कधी वाटतं तुला खूप ठोकून काढावं || १ ||

सगळं का ओठांनी सांगावं लागतं ,
कधीतरी डोळ्यांची भाषा पन समजावी माणसानं ,
काय आहे मनात माझ्या , ते मन लावून जाणून घ्यावं ,
पन तू तर आहेस पुस्तकी किडा ,
माहित नाही कुठून माझं मन तुझ्यावर आलं ??????
म्हणून कधी कधी वाटतं तुला खूप ठोकून काढावं || २ ||

तुला नाही कल्पना , आपलं गुपित फुटल्याची ,
सर्व जगात आपलीच चर्चा होत असल्याची ,
तू तर आहेस आपल्याच जगात मस्त ,
विचार दिसतोय तुझा , 
सर्व पुस्तकांना आजच करायचा फस्त 
म्हणून कधी कधी वाटतं तुला खूप ठोकून काढावं || ३ ||

किती करू मी इशारे ,
पन एकही तुझ्या डोक्यात ना शिरे ,
माझ्या लल्लू , माझ्या उल्लू , थोडा हुशार हो .
प्रेमाचे दोन लाघवी शब्द बोल ,
पन तू तर आहेस पत्ता गोबीचे फुल ,
बस पानं आहेत कि काढत जावं काढत जावं आणि काढताच जावं ..........
म्हणून कधी कधी वाटतं तुला खूप ठोकून काढावं || ४ ||

कवितेविषयी - वरील कविता म्हणजे ,'' एका प्रेयसीने आपल्या अभ्यासू आणि पुस्तकी किडा असलेल्या प्रियकराचे खट्याळपने केलेले वर्णन तसेच लटक्या रागात त्याला दाखवलेला धाक आहे .''

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

Comments

Popular Posts