Sunday, 6 November 2011

तर मी काय करावे

तिला शब्दात बांधणे मला जमले नाही,
तिचे मन समजावे इतका मी मनकवडा नाही,
ती नेहमी राहिली गप्प,
तर मी काय करावे,
तिने कधी भावनांचा प्रवाह माझ्याकडे पाठवला नाही,
तर मी काय करावे,
मी घेत होतो शोध जिचा,
ती असेल इतक्या जवळ माझ्या,
असे मला सुध्दा वाटले नाही,
तर मी काय करावे........

कवयित्री- अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment