Thursday, 3 November 2011

वाट पाहते मी गुरु माउलीची

वाट पाहते मी गुरु माउलीची ,
आणुनी कंठी प्राण माझा ,
अंत होतोय माझ्या इच्छेचा ,
फळ मिळावे मज तपस्येचे ,
दर्शन होऊनी गुरु माउलीचे ,
सर्वांमध्ये बसूनही , 
मन माझे गुरुचरणी लागे ,
प्रसन्नता त्यांच्या मुखाची ,
वाटे मज वेचुनी घ्यावी ,
अन हृदयी साठवून ठेवावी ,
मग वाटेत भेटणाऱ्या गोर गरीबात ती वाटून द्यावी ....
व्यर्थ बडबड सहन न होई ,
गुरुमाउलीची वाणी पडावी कानी ,
अमृतवचन ग्रहण करुनी ,
आयुष्य सत्कर्मी लावावे ..........    

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

1 comment: