या जन्मावर

खालील लेख १३-१०-२०११ च्या 'लोकशाही वार्ता' या वर्तमान पत्रातील 'झिंग' पुरवणीत प्रकाशित झालेला आहे.

या जन्मावर ....
ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र आणि रात्रि नंतर दिवस येतोच तसेच काहीसे सुख दुखा बाबतही असते . हे तत्व आता पर्यंत कितीतरी तत्वज्ञान्यांनी समजावून सांगितले आहे . पण तरीही दुःख सागरात स्वताला बुडवून निराशेपायी होणाऱ्या आत्महत्त्या अजुन थांबल्या नाहीत . ह्या निराशेची कारणं तरी काय असतात !!! कधी प्रेमभंग , कधी अपेक्षाभंग , तर कधी मानवी मनाची कधीही न संपणारी भूक . त्यातून येणारी निराशा इतकी प्रबळ असते की , आपण आपल्यावर प्रेम करनाऱ्या व्यक्तीचाही तिरस्कार करायला लागतो . वाटतं कि या जगात आपली गरज कोणालाच नाही . पण तुम्ही हे विसरता की या जगात खुप गरजू आहेत . नाही राहायचे तुम्हाला आपल्या परिवारात , ओळखीच्या लोकात तर नका राहू , सोडा त्यांना आणि स्वतालाही मुक्त करा सर्व बंधनातुन . जा त्या गरजु कड़े ज्यांना कोणाच्यातरी सहकार्या शिवाय एक पाऊल पण पुढे टाकता येत नाही . जीव द्यायचाच असेल तर त्यांना द्या ज्यांच्या वाटेला माया ममता कधी आलेलीच नसते . '' आता माझ्या आयुष्यात नवीन करण्या सारखे काहीच नाही .'' असे म्हणुन स्वताला नाहक संपवनाऱ्यांची ही काही कमी नाही . असा विचार ज्यांच्या कोणाच्या मनात आला असेल त्यांनी कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमातील मुलांना भेटावे . त्या कोवळ्या कळ्यांच्या डोळ्यात निरखून बघावे . त्यांच्या अधूरे पनाची जाणीव होईल . त्यांच्या चेहऱ्यावरील भकासपना हा उजाडलेल्या डोंगर माळापेक्षाही भकास वाटेल .अहो डोंगर माळावर तरी केव्हातरी हिरवळ आलेली असते . पण ह्या मुलांच्या वाटेला उपक्षे शिवाय काहीच नसते . त्यातही जि बिचारी कैद्यांची मुलं असतात , त्यांचा दोष नसतांनाही त्यांना वाडित टाकल्यासारखे जीवन जगावे लागते . तुम्ही म्हणाल सरकार तर ह्यांच्या सर्व गरजा पूर्ण करते आणि आम्हिपन काही ना काही दान देतच असतो . बरोबर पण भावनिक गरजेचे काय ??? ही गरज तर पैशेच काय पण हीरे माणिक सुध्दा पूर्ण करू शकत नाही .तेव्हा जीव लावा ह्या मुलांना , आपल्या प्रेमाने ओथम्बुन टाका ह्यांना ... म्हणजे ह्या कळ्या उमलून जेव्हा सुगंधित फुलांमध्ये परिवर्तित होतील , तेव्हा त्यांच्या सोबत तुमच्या आयुष्यालाही एक नवीन वळन मिळेल .
जेव्हा पण निराशा येइल तेव्हा एवढे करून बघा . '' मी काहीच नाही मिळवले .'' असे म्हणुन कोहम करनाऱ्यालाही जग जिंकल्या सारखे वाटेल . 
'' आयुष्यभर मृगजळा मागे धाव धाव धावणारे आपण ,
आपल्याच इच्छा पुर्तिसाठी रात्रंदिवस धडपडणारे आपण ,
नको त्या गोष्टीसाठी प्राण पनाला लावणारे आपण ,
प्रेमाचे नाव देऊन रागापायी आपल्याच प्रेमाला संपवनारे आपण ,
सुडाच्या भावनेने चडफडणारे आपण ,
मोहसागरात स्वताला हरवून बसणारे आपण ,
थोड़े थांबा , विश्रांति घ्या ह्या शर्यतितुन ,
आणि वेळ द्या स्वताला , 
मायेची पाखर घाला त्या चिमुक्ल्यांना ,
ज्यांना मायेने भरवायला कोणाला वेळ नाही ,
जीव लावा त्या व्रुद्धान्ना ,
ज्यांच्या मुलांना त्यांच्याशी बोलायला वेळ नाही , 
आणि विश्वास ठेवा स्वतावर , त्या निसर्गावर आणि आठवा मंगेश पाडगावकरांची कविता ,
'' या जन्मावर ,  या जगण्यावर शतदा प्रेम करावे ..............''
या कवितेतील गूढ़ अर्थ ग्रहन करा , तुम्हीही आपल्या जीवनाच्या प्रेमात पडाल.... 

लेखिका अर्चना सोनाग्रे

Comments

Popular Posts