Friday, 21 October 2011

काही प्रश्न

मृगजळ इतके प्रिय का असते ?
हवी असलेली व्यक्ती अल्पायुषी का असते ?
प्रेमाचे क्षण इतके लहान का वाटतात ?
दुखाचे क्षण इतके मोठे का वाटतात ?
साधेपणाची कुणाला कदर का नसते ?
माणसाचे शहाणपण टिकाऊ का नसते ?
मूर्खपणाचा झरा सतत वाहत का असतो ?
चतुरपणाचा बोलबाला का असतो ?
प्रत्येक गोष्ट मिळवण्याच्या आधी इतकी प्रिय का असते ?
अन तीच मिळवल्यावर तिचे मोल कमी का वाटते ?
श्वास चालू तरी शरीर निर्जीव का वाटते ?
सारे ठीक असून , मरण इतके जवळ का वाटते ?
मला पडलेल्या प्रश्नांना कधीच उत्तर का नसते ?
अन मिळाले तरी ते अधुरेच का वाटते ?


कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment