Thursday, 30 July 2015

ए पि जे अब्दुल कलाम the mesaile man

पाच वर्ष राष्ट्रपती पद भुषवुनही राजकारणी मोहाला ते बळि पडले नाहीत . ना राजकारणाची छाप त्यान्नी आपल्या व्यक्तिमत्वावर कधी पडु दिली. ते हाडाचे शिक्षक होते आणि त्यान्ना शिक्षक म्हणुन विद्यार्थ्यांचे आयुष्यभर मार्गदर्शन करायचे होते . प्रुथ्वी क्षेप्णास्त्राचि परिक्षण चाचणी सफल झाली आणि अब्दुल कलाम हे नाव लौकिक झाले . पुढे अग्नि क्षेप्णास्त्र चाचणी प्रयत्न असफल झाला तेव्हा त्यांचि आलोचनाहि झाली. परंतु ते थाम्बले नाहि. त्यान्नि प्रयत्न सुरु ठेवले . आणि तिसरा प्रयत्न यशस्वि झाला . 'प्रयत्नांति परमेश्वर हि म्हण त्यान्नि खरि केली. अब्दुल कलाम राष्ट्रपति झाले तो काळ म्हणजे त्यांच्यासाठि सुवर्णकाळ . पण मिळालेल्या यशाने हुरळुन न जाता त्यान्नि त्यांच्यातिल शास्त्र द्न्याला नेहमि वाव दिला . पाच वर्षाचा काळ गेला . परत निवडनुकिचे बिरुद वाजले . राष्ट्रपति पद परत कलाम यान्ना देउ केले . पण त्यान्नि ते नम्र पणे नाकारले . त्यान्ना राजकारणाच्या मोहात अडकुन त्यांच्यातिल शिक्षकाला मागे टाकायचे नसेल कदाचित .

त्यांच्या डोळ्यात आता स्वप्न होते ते 2020 चे . लोकसंख्या गणनेच्या निष्कर्षानुसार 2020 मधे भारत हा जगातिल सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणुन उदयास येइल . त्याजोगे आतापासुनच तयारिला लागले . आताचि तरुण पिढी पुढिल तरुणांचे मार्गदर्शक असावि म्हणुन देशभर विद्यालयान्ना भेटि देउन ते विद्यार्थ्यांच्या जवळ जाउ लागले. आपल्या मात्रुभुमित राहुनच आपलि व आपल्या देशाचि प्रगती कशि करता येइल ? आपली भुमि निर्मळ जिवन जगण्याच्या लायकिची करण्यासाठि काय काय करता येइल ह्यावर त्यांचा जास्त भर होता .

माणसाने जन्मताच श्रिमंत असणे किंवा श्रिमंत असुनहि एकाच प्रयत्नात यश मिळवने जरुरि नाही हे त्यान्नि सिध्द केले. B.Sc पुर्ण झाल्यावर त्यान्ना कळुन चुकले कि फिजिक्स हा आपला विषय नाही आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचे ठरवले . पण फि कशि भरणार ? तेव्हा त्यांच्या मोठ्या बहिणीने तिची सोन्याचि चैन आणि कंगन मोडुन तरुण कलामला पैसे दिले . किती विश्वास लहान भावावर मोठ्या बहिणीचा ! त्या विश्वासाला कलामजिने आयुष्य झोकुन जपले . आयुष्यात खुप काही कमावले त्यान्नि . पण कधिच उगाचच प्रकाश झोतात आले नाही. नेहमि त्यांचे कामच बोलले .Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

No comments:

Post a Comment