फाशी

रात्री आठच्या बातम्या विनोद कधिच विसरत नाहीत . तो त्यांचा नित्यनियम . त्यातच काहि खास बातमी असल कि मला ति जोरात सागतात . म्हणजे स्वयम्पाक करत असली तरि मला सुध्दा बातम्या पाहायचा फिल यावा हा उद्देश .
 रात्री नेहमिप्रमाणे बातम्या सुरु असतान्ना त्यांचा आवाज आला ,"इकडे ये. याकुबला उद्या फाशी होतेय. त्याचि तयारी दाखवत आहेत."
काम आटोपल्यामुळे मि गेलि पाहायला. नागपुर सेंट्रल जेल , तेथिल बंदोबस्त दाखवने सुरु होते. तसेच बाजुला झळकत होते,"उद्यापासन याकुब मेमनचे खाते बंद होणार ."
पहाटे त्याला किती वाजता उठवले जाइल इथपासुन ते फाशिचा कार्यक्रम पुर्ण झाल्यावर काय काय होइल ते सविस्तर सांगण्यात आले . आम्हि दोघही सुन्न झालो . एखाद्या मोठ्या आजाराने ग्रस्त मानसाला माहिती असते कि आपण कधितरि कमि अधिक कालावधिने मरणार आहोत . पण फाशिची शिक्षा म्हणजे . स्वताचि तिरडी स्वताच्या डोळ्यान्नि बनवतान्ना पाहणे . झोप लागत असेल का त्या व्यक्तिला रात्रभर जो फाशिला जात असेल आणि तोहि झोपु शकतो का  जो फाशि देणार असतो. किति विचित्र आणि बेचैन करणारे वातावरण राहत असेल तिथे !त्या रात्रिचे प्रहर कठिण . आणि वरिष्ठांवर एक मोठे कार्य सुरळित पार पाडण्याची जबाबदारी.
फाशि देणे म्हणजे फक्त एक कार्य नव्हे तर ति एक मोठी प्रक्रिया असते हे मला बातम्या पाहुन कळले . त्याची पुर्वतयारिही अतिशय काळजिने करावि लागते. जसे फाशि दिल्या जाइल तो दोरखंड बनवने, त्याला तुपात भिजवुन नरम करणे म्हणजे फाशि जाणार्याला जास्त त्रास होणार नाही. तसेच त्या व्यक्तिच्या वजनाचा व उंचिचा पुतळा बनवुन त्यावर चाचणि घेणे . असे कितितरि उद्योग जेलरला त्यांच्या नजरेखालि पार पाडावे लागतात .
Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts