Friday, 31 July 2015

गुरुपौर्णिमा

तसे तर योग् काम करण्याचा विषेश असा कोणताच दिवस नसतो . ज्या दिवशी ते काम पुर्ण होते तोच महान दिवस होतो . पण समाजाला एका दिशेत आणि प्रत्येकाला त्याचे मन जपण्याची संधि व त्याचा भाव प्रकट करण्याची संधी मिळावी म्हणुन हे वेग वेगळे दिन ठरवण्यात आले असावे असे मला वाटते .
त्यातिलच एक गुरु पौर्णिमा . म्हणजे गुरु चरणी आपला भाव प्रकट करण्याचा दिवस . आज तो दिवस आहे .
आतच्या काळात गुरु म्हणजे शाळेत शिकवणारे शिक्षक . पण पुरातन इतिहास पाहता असे लक्षात येते कि गुरु म्हणजे फक्त शालेय शिक्षण देणारी किंवा उदरभरन करण्याचा मार्ग दाखवणारी व्यक्ति नसुन . आयुष्य आनंदाने जगण्याची कला समजावुन सांगणारी , योग्य अयोग्य गोष्टिमधिल अंतर दाखवणारी व्यक्ति होय.

गुरुचरणी विसावे प्राण
अर्पण तिथे मान सन्मान

प्रथम गुरु माता पिता
दुसरा निसर्ग खरा
तिसरे माझे सद्गुरू छान

महति त्यांची मि कोण वदनार
ति तर आहे अनंत फार .

मनि वसे एकची इच्छा
द्रुष्टी त्यांचि या शिष्यावर असे सदा

 Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

No comments:

Post a Comment