Sunday, 19 May 2013

मी धनगर : प्रेमविवाह


माझ्या आत्या बहिणीने intercast लग्न केले आणि घरी मुली प्रेमविवाह करून कशाप्रकारे आपल्या आई बापाच्या इज्जतीला वेशीला टांगतात ह्या चर्चेला उत आला . आतापर्यंत किती मुलींनी पळून जाऊन , कशाप्रकारे लग्न केले हि पोथी वाचली गेली . जे मला अजिबात पटले नाही . कुणी पळून जाऊन लग्न केले कि आपण लगेच त्याच्या तिच्या नावाने बोटं मोडायला लागतो . आणि त्यातही पळून जाणारी मुलगी असेल तर मग बोलायची सोयच नाही . मी मानते कि आपल्या जातीत हे प्रमाण जास्तच वाढलेय . व हे बरोबरही नाही . कारण त्यामुळे आपल्या जातीचा विकास खुंटतोय . पण त्यात आपलीही चूक कमी नाही . आपण कधी विचार करतो का कि एवढ्या शिकल्या सवरलेल्या डॉक्टर , engineer मुली का प्रेमविवाह करतात , जेव्हा कि आपल्या जातीतही उच्च शिक्षित मुलांची कमतरता नाही . नाही करत न आपण विचार . आपण फक्त नावं ठेवतो . आज जग कुठे जातेय . Globalization च्या काळात नका जात सोडू , कमीत कमी पोटजात तर विसरा . म्हणजे मुला मुलींना त्यांच्यासाठी आपल्या जातीतच योग्य choice निवडता येईल . जग किती पुढे जातेय व आपण जिथे होतो तिथेच रखडलोय . दुसरा आपला मोठा शत्रू म्हणजे ,''हुंडा पद्धत '' आई वडिलांनी आधी मुलीला उच्च शिक्षण द्यावे आणि वर योग्य मुलासाठी लाखात हुंडाहि मोजावा . आजच्या तरुणीला हे कसे पटणार ? त्यातही लग्नात मुलांच्या घरच्यांचे सतराशे साठ नखरे सहन करायचे ,'हात पाहू दे , पाय पाहू दे , चालून दाखव , बोलून दाखव , हळू आवाजातील बोलणे ऐकून दाखव .' काय म्हणावे याला ! अरे बघायचेच आहे तर रक्त गट जुळतो का ते बघा , एड्स ची चाचणी करा, विचारांची संलग्नता पहा . पण आपल्याला हे कधी जमलेच नाही . म्हणून आपला समाज एवढा मोठा असूनही आपण धूळ खात बसलोय .आपल्या जातीतील मुली आपल्यातच ठेवायच्या असतील तर त्यावर एकच उपाय आहे . तो म्हणजे पोटजातीची  बंधने तोडून त्यांना आणखी choices द्या . नाहीतर आपलीही परिस्थिती मारवाडी समाजासारखी होईल . व आपल्यालाही इतर समाजातील मुलींना आपल्या घरी सून बनवून आणावे लागेल .
धन्यवाद !
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

2 comments:

  1. Archanatai, aaple likhan ani tyatil purogami drushtikon avadla. Apan samaj hitasathi khup changle prabodhan karat ahat.
    Mi apla ha lekh mazya www.sahyadribana.com ya blogvar taku ichhito. Apli permission havi ahe.
    Dhanyawad.

    ReplyDelete
  2. mala fakt aaplya samajache hit karayache aahe . tevha aapan nakkich ha lekh aaplya blogvar taka aani aaplya samaj bandhu paryant pohachava. dhanyawad

    ReplyDelete