अथर्वंश

अथर्वंश ! खूप वेगळे नाव वाटते ना . आई जेव्हा नगर परिषद मध्ये बाळाचे नाव नोंदवायला गेली तेव्हा तेथील कारकून सुद्धा अचंभित होऊन म्हणाला ,''नक्की हेच नाव ठेवायचे आहे ना ? नाही म्हणजे अथर्व , अंश , वंश हि नावं ऐकली होति. पण अथर्वंश पहिल्यांदाच ऐकतोय .'' जसं कि माझं मत ठाम होतं मी आईला बोलले कि हेच नाव ठेवायचे . पण हेच नाव का ? तर झाले असे कि मला बाळ होणार हे माहित झाले तेव्हापासूनच मी आणि विनोद बाळाच्या नावाचा शोध घेऊ लागलो .  मुलगा कि मुलगी हे माहित नसल्यामुळे दोघांची नावं शोधायची होति. अशातच येणाऱ्या बाळावर चांगले संस्कार व्हावे म्हणून मी रोज 'अथर्वशीर्ष' वाचायची . आणि एक दिवस मनात आले मुलगा झाला तर का नाही अथर्व हेच नाव ठेवावे . मग काय ठरलं नाव माझ्याकडून ,'अथर्व' . पण आमच्या दोघांच्या प्रेमाचा अंश म्हणून विनोदला 'अंश' हे नाव आवडले . मुळात दोघांनाही काय होणार हे माहित नव्हते . पण आम्ही जेव्हा मनःशक्ती संस्थेचे शिबीर केले तेव्हा तेथील अनुभवी वक्त्याने सांगितले होते ,''तुम्हाला जे बाळ हवे असेल ते नाव पूर्ण श्रद्धेने मनात ठेवून त्याला उद्देशून रोज प्रार्थना करीत जा , त्या बाळाचे अस्तित्व आताच अनुभवा , त्याला तुमच्या प्रत्येक कृतीत शामिल करा . तुमची श्रद्धा खरी असेल तर तसे बाळ तुमच्या घरी नक्की येईल .''  आम्ही तसेच केले. विनोद रोज सकाळी नोकरीवर जातांना अंश म्हणून त्याच्याशी बोलायचे . तर मी अथर्व म्हणून  त्याच्याशी  संवाद साधायची . नाव नोंदवायची वेळ आली तेव्हा प्रश्न पडला कि नक्की कोणाच्या आवडीचे नाव ठेवायचे ? माझ्या कि विनोदच्या ? विनोदला माझे मन दुखवायचे नव्हते तर मला त्यांना नाराज नव्हते करायचे . त्यावर उपाय म्हणून मी एक युक्ती लढवली . अथर्व आणि अंश या दोन्ही नावांना जोडून अथर्वंश ह्या नावाची उत्पत्ती झाली . आणि आमच्या बाळाचे नाव फक्त अथर्व किंवा अंश न ठेवता अथर्वंश ठेवले . दुसरी गोष्ट म्हणजे अथर्वंश म्हणजेच अथर्वचा अंश , म्हणजेच प्रथम पुज्य देवता श्री गणेशाचा अंश . आमच्या दोघांच्या इछेचा मानही राहाला आणि एका नवीन नावाचा निर्मान हि झाला . 

Comments

Popular Posts