Wednesday, 4 April 2012

मी धनगर - ४ -विस्कळीत समाज

काही दिवसांपूर्वी एका धनगर मित्राचा आपला धनगर समाज किती विस्कळीत आहे, त्याचे किती तोटे आहेत , हे  दर्शवणारा मेल मला मिळाला. वाचून आश्चर्य वगैरे मुळीच वाटलं नाही. कारण आपण आहोच त्या लायकीचे. बाबा आदमच्या जमान्याची मानसिकता अजून बदलली नाही आपली. त्याला इतर गोष्टी कारणीभूत नसून आपणच कारणीभूत आहोत. मला सांगा किती धनगरांना आपली पोटजात सोडून इतर पोटजातीच्या लोकांची माहिती आहेत? त्यांच्याशी विवाह संबंध प्रस्थापित केला जातो? एक फेसबुक सर्वांना एकत्रित आणतेय. म्हणून आपण बोलतो तरी. पण काय? कसा आहेस? कोण आहेस? काय सुरु आहेस? बास......जास्तीत जास्त धनगर असल्याचा अभिमान दाखवतो आणि इतका मोठा समाज असूनही मागेच असल्याचा पुळका आणतो. या व्यतिरिक्त करतो काही? विचार करतो कधी,'' हे असं का म्हणून?'' कारण आपण होतो तिथंच खितपत बसलोय. महाराष्ट्रात मिळणाऱ्या आरक्षणातंच आपण खुश आहोत. त्याच्या जोरावर पोरगं/ पोरगी इंजिनियर, डॉक्टर होते, काही बिचारे कारकून म्हणून लागतात, पोलीस बनतात. पुरे कि. जास्तीची हाव कशाला?????????? नाही का? हि अशी वृत्ती ठेवली तर समाज विस्कळीतच राहील न? कारण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे? ठीक आहे नका देऊ पण फक्त धनगर ह्या शब्दाला तरी जागा. सोडा ना आपल्याच पोटजातीत कुजण्याचा व्यर्थ हट्ट. इथं संपूर्ण जग एकत्रित व्हायला बघतेय. सार्वभौम होतेय. आणि आपण आपल्या पोटजातीच्या पुढे जातंच नाही. लोकं आंतरजातीय विवाहाला सर्रास हो म्हणताहेत. आपण कमीत कमी पोटजात विसरून धनागरातल्या धनागरातच विवाह करा. अरे ते नका सांगू आम्हाला. कारण जी कधी जात नाही ती म्हणजे जात. मग चिकटा तिला. आणि नका बोलू पुन्हा, नका चर्चा करू किंवा ताशेरे ओढू कि आपला समाज किती विस्कळीत आहे म्हणून. मला तरी वाटते कि विवाहसंस्था हि आपल्या भारतीय समाजाचा मूळ आधार आहे. पाया आहे. म्हणूनच  राजकारणी लोक  सामुहिक  विवाहाचे सोहळे रचतात. काहींनी तर त्याच सामुहिक विवाह सोहळ्यात स्वतः सुध्दा लग्न केले आहे. उदाहरण  - रवी राणा [अमरावती]. कशासाठी त्यांनी इतकी उठाठेव केली असेल? त्यांच्या घरी काही कमी आहे का कि त्यांना असं सामुहिक  विवाह सोहळ्यात  लग्न करावं लागलं? राजकारण! आम्ही किती सामाजिक आहोत हे दाखवायचं राजकारण. आपल्याला कधी जमणार हे?  मी एक धनगर आहे. मागल्या वर्षी लग्नाचा विचार निघाला. म्हटलं काय करायचं पोटजातीचं? मुलगा चांगला असला म्हणजे झालं. धनगर विवाह संस्थेत [matrimony ] अडीच हजार भरून नाव नोंदणी केली. तेव्हा आलेला अनुभव अतिशय वाईट. कोणाला आपली पोटजात सोडून इतर पोटजातीच्या मुलीशी विवाह करायची इच्छा नव्हती. तर जास्तीत जास्त मुलांना मुभा नव्हती. कसं होईल अशा समाजाचं. मला कीव आली त्या मुलांची. विदर्भियांशी आमचा लग्नाचा व्यवहार होतंच नाही. हे ऐकून धक्काच बसला. नाही होत तर मग आता करा ना. आपण आपलेच एकमेकांना जाणून घेणार नाही तर कोण जाणणार? आपल्यात एकी येईल कशी? आता तरी तोडा हे पोटजातीच्या बंधनाचे पाश आणि या एकत्र. आपण आपलेच भेटा. एकत्रित या म्हणजे पुढे आपली मुलं तरी हाच विषय चघळणार नाहीत कि,'आपला धनगर समाज किती विस्कळीत आहे?'

No comments:

Post a Comment