पाउस

आज दोन तीन दिवस झालेत बरसतोय तो
तन मन अंग अंगाला गारवा देतोय तो
पण स्पर्श अजुनही बाकि आहे
कारण सतत लपंडाव खेळतोय तो ..

बहुतेक रुसला आहे माझ्यावर
कारण खुप बदल झालेत आता
खुप अंतर वाढलेय आमच्यात

आधि कसा धीरच नाहि राहायचा
दिसला तो कि आम्ही अंगणात

सोडष वयाची मि
पाउस धारान्नि भिजुन पुलकित व्हायचि मि

पायांखाली असायचा मातीचा चिखल
अन खुप खुप चालायचि दंगल

ना कशाचि चिंता
न कुणाचि लाज
फक्त खळखळुन बिलगणारा तो पाट
असा तो थाट आठवुन डोळ्यात दाटले आभाळ आफिसच्या खुर्चित बसुन टक लावुन पाहतेय
खरच किती सुंदर होता तो काळ

Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts