आईपन

असे म्हणतात कि स्त्री हि शक्तीरुपिणी तर असतेच पण जेव्हा ती आई होते तेव्हा तिची शक्ती कैक पटिने वाढते. काल मि हे प्रथमच अनुभवले सुद्धा.
झाले असे कि आमच्या प्रिय अंशु उर्फ अथर्व बाळाने लपंडाव खेळता खेळता मला बाबाला आणि शेजारच्या मुलाला हाल मधे बंद केले. कळी लावल्या गेलि पण उघडता येइना म्हणुन क्षणातच साहेबांची घाबरगुंडि उडाली आणि तो जोर जोरात रडु लागला . एव्हाना बाबान्नि त्यांच्या मित्रान्ना घराचा मुख्य दरवाजा तोडायला बोलावले सुध्दा . पण अथर्व चा रडण्याचा आवाज मला सारखा बेचैन करत होता. आता क्षणभर सुध्दा वाट पाहायचि इच्छा राहिली नव्हति. तेवढ्यात शेजारच्यान्नि जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरवात केलि. त्याने अथर्व आनखि घाबरला व दुप्पट जोरात रडायला लागला. वाटले जणु चाबकाने मलाच कुणितरि फटके देतय. आता वाट पाहणे अशक्य . मि दरवाजाच्या कळिच्या नटाजवळचा भाग तोडता येइल असे काहितरि शोधु लागलि. ओपनर मिळाले.पण त्याने काहिच झाले नाहि तोच माझी नजर हाल मधे ठेवलेल्या देवघरातिल कापुर लावायच्या पितळेच्या जाड्जुड निरंजनिवर पडलि. तिच्या एका टोकाने मि जोर जोरात ,आपलि सर्व शक्ती एकवटुन बोल्टच्या आजुबाजुचा भाग तोडु लागलि. तेव्हा मझ्या हातालाहि प्रत्येक वारासोबत झटके बसु लागले. वेदना होत होति पण आईच्या वेदनेपुढे ती कमिच होति. दोन मिनिटात तिन बोल्ट काढले अन जोरात दरवाजा उघडला . आमच्या शेजारच्यांच्या भाषेत सांगायचे तर दया स्टाइल मधे दरवाजा उघडला. जशी मि दिसली अथर्व रडायचा थाम्बला व मला बिलगला.
हात अजुनहि दुखतोय. कळ येतेय पण तरिहि चेहर्यावर हसुच आहे. कारण आईपणाने सहनशक्तिची देनगिहि दिली.Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts