हव्यास

पाहता पोर उनाड रस्त्यावर जगणारे
आकशाला छत मानुन
रस्त्याला घर समजुन
ऐटीत मिरवणारे
उकिरड्यावरिल जमा करुन
उदर भरण करणारे
भर थंडीत तोडक्या कपड्यात वावरनारे

मज वाटले समाधान कि
मि नाही त्यांच्यातिल एक

जे जे हवे ते सर्व आहे मजकडे
राहायला घर घालायला कपडे

तोंडाला घास आहे
नाहि कशाचा उगि त्रास

तरिही अजुन पाहिजेच आहे
काहितरी खास ........

हे आले मनात अन
दुर झाला समाधानी श्वास

सतत काहितरि हवच असे
का नाही सम्पत आपला हा हव्यास

Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts