स्वागत नव वर्षाचे !


हा माझा या वर्षातील पहिलाच लेख म्हणून सर्वात आधी , सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . Happy New  Year . दोन महिने उशीर झाला म्हणा पण करणार काय आणि सांगणार काय ? प्रकृतीची साथ नव्हती एवढेच सांगू शकते. बस हि शुभेच्छा गोड करून घ्या म्हणजे झाले . कारण माझ्या तर्फे तरी नव वर्षाचे स्वागत आजच होत आहे, अगदी दोन महिन्याचे सुखमय आयुष्य जगल्यावर .
दोन हजार बारा आले अन कितीतरी अफवांनी काहूर माजवले . जग बुडीवर सिनेमा निघाले, नाटक बसवली गेली , लेख लिहिले गेले , यज्ञ झाले, होम हवन झाली आणि भीतीदायक वातावरणाचे सावट चारही दिशांना पसरले . काहींनी चक्क आत्महत्येचा मार्ग निवडला तर काहींनी जग बुडून आपण मरु व आपली संपत्ती वाया  जाईल म्हणून खा  प्या मौज करा हा मार्ग निवडला . जसे जसे वर्ष पुढे सरकू लागले, तसे तसे मनात धस्स होऊ लागले . उद्याचा दिवस आपण पाहू कि नाही ,' हा विचार सतत पाठपुरवठा करीत होता . पण राजकारणी , मोठ मोठे व्यावसायिक यांना आपापल्या कामात मग्न बघून वाटायचे ,'हे माणूस नाहीत का ? ह्यांना मारायची भीती वाटत नसेल का ? कि दादा म्हणतो तेच खरे आहे ? म्हणजे हि जगबुडी वगैरे फक्त आपल्या मध्यम वर्गीयांसाठी आहे. आपल्याला गुंतवून ठेवण्यासाठी आहे. कारण आपण  मध्यम वर्गीय जर भीती दाखवली कि भितो आणि शरण जातो नको त्या गोष्टीला . लक्ष केंद्रित करतो अशा ठिकाणी जिथे त्याची काहीच गरज नाही . अशात दुर्लक्षित होतात समाजकंटक . आपण इकडे कर्म कांडत गुंतलो कि ते आपले काळे धंदे करायला मोकळे . गरिबांना ना ह्याचे सुतक असते ना श्रीमंतांना फिकीर !
आणि इतका गाजा वाजा करून बघा काय झाले ते .
                   म्हणता म्हणता जगबुडीचे वर्ष आले ,
                   धोक्याच्या घंटांनी धाबे दणाणले ,
                  एक एक दिवस काळीज मुठीत धरून काढले ,
                  आपला जीव वाचवा म्हणून व्रत वैकल्य केले,
सोळा सहस्त्र देवांना साकडे घातले ,
आणि न जाणे कुठे कुठे डोके टेकले ,
पण ऐन वेळी शहाणपण सुचले ,
 वाटले कुठेतरी चुकतोय आपण कि इतरांचे काळीज निर्भय झाले ,
                   जगबुडीत जाऊ सारेच ,
                   तरीही त्यांच्या [श्रीमंत व गरीब ] ओठांवर हास्य कसे?
                   रोजचे त्यांचे आयुष्य स्थिर कसे ?
                   तेव्हा ठरवले , आपले कर्म आपण करीत जावे ,
आला क्षण आनंदात जगावे,
उगी उद्याचा ताप घेऊन डोक्यात ,
कशाला आज तिळ तिळ मरावे ……… ?

आणि खरच दोन हजार बारा आले तसे गेले हि . काही झाले नाही [मनोरंजना शिवाय ] . सर्व जसेचे तसेच आहे . समुद्रही तिथला तिथे अन हिमाच्छादित पर्वतही जसेच्या तसेच आहेत. तेव्हा काय कराल ? आला क्षण आनंदात जगाल !   Writer, Archana Sonagre.

Comments

Popular Posts