होळी

काल होती होळी,
सर्वांनी खाल्लीच असेल पुरणाची पोळी .

आज आहे रंगपंचमी,
रंगांची उधळण सुरु झाली असेल खरी ,

खेळा हो खेळ रंगांचा आज ,
पण जरा जपून हं ,
पाण्याची नका लावू वाट …

खेळा हो खेळ रंगांचा आज,
पण जरा जपून हं ,
सामाजिकतेचा नको व्हायला ऱ्हास …

खेळा हो खेळ रंगांचा आज ,
पण जरा जपून हं ,
नात्यांना लागेल नाही काळिमा ,
थोडे ठेवा भान …

रंगांशिवाय आयुष्य जसे स्वप्नांशिवाय ध्येय ,
पण त्यांचीही जबरदस्ती नका करू आज,
सर्वांना आहे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आशीर्वाद …

रंग पंचमीच्या हार्दिक  शुभेच्छा ………….

Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts