Tuesday, 6 March 2012

होळी

उत्सवात उत्सव होळीचा,
रंगात रंग गुलालाचा,
होळी अन गुलालाची पडली गाठ,
तेव्हा झाली रंगांच्या सोहळ्याला सुरुवात,
चला भरा पिचकारीत रंग,
अन उडवा रंगीत बार,
नका करू कपड्यांची चिंता,
नका ठेऊ रंगण्याची भीती,
खूप रंगा ह्या आनंद रंगात,
हसा आणि हसवा आज अंगणात,
जाण इतुकी फक्त ठेवा मनी,
कुणा न व्हावी इजा कशाप्रकारची,
किंवा मनी न येवो शंका मानहानी झाल्याची,
झालेल्या चुकांची मागावी क्षमा,
चुकलेल्यांना माफ करा,
सर्व रुसवे फुगवे टाका होळीत,
आनंद रंगात मारा डुबकी,
उधळा गुलालाचे गुलजार!

अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment