क्रोध

कुणीतरी मनाविरुद्ध वागलं आज,
असाच नाही अंग अंगात दाह पेटला आज!
कुणीतरी अपशब्द बोललं आज,
माझं अन्तः करण तार तार झालं आज.
कुणीतरी खूप छळलय आज,
म्हणून इतकी मी गप्प झाली आज.
कुणीतरी माझ्याच अस्तित्वावर घाव केला आज,
तरीही मी अशी शांत का आज?
का माझा क्रोधाग्नी भडकला नाही?
कि भडकायच्या आधीच मी दफन केलंय त्याला.
माझ्या भावना अप्रकट ठेऊन कुठवर मी जगेल?
वाटतंय जसं एक विषारी झाड मी रोवलय माझ्यात,
अश्रूंचं खारट पाणी घालतेय त्याला.
असा क्रोध जगतोय माझ्यात.
न जाने हा क्रोध कुणाला मारेल?
न जाने हा क्रोध कुणाचा बळी घेईल?
कि मलाच गिळून नष्ट तो करेल?

Comments

Popular Posts