बहीण भाऊ


मनाच्या कोपऱ्यात 
हृदयाच्या कप्प्यात 
दडलेलं नातं, 
खुद्कन हसलं 
जेव्हा हातात बहिणीनं 
पाठवलेल्या राखीचं पाकीट पडलं !
पहिला मित्र, पहिली मैत्रीण 
बहीण भाऊ आणि कोण? 
किती ती भांडणं, 
रुसव्या फुगव्यांचा खेळ, 
भाऊ राज्याचं चिडवून चिडवून 
बहिणीला मेतकुटीला आणणं !
अखेर तिचं आईला शरण जाणं 
अन बाबांच्या हातून भावाचं धपाटे खाणं !
दिवसांचा अबोला 
बघून घ्यायच्या धमक्या 
रात्री परत दंगा मस्ती अन पंगा !
असंच भांडता भांडता 
कधी वयात आलो 
हेही न समजणं, 
"आता सगळंच तूझ्या एकट्याचं!
मी फिरकणार पण नाही हं इकडे!"
लाडक्या बहिणीचं भावाची फिरकी घेणं !
मात्र बहिणीचं लग्न लावून 
दुसऱ्याच्या हवाली करणं 
म्हणजे भावासाठी जसं 
 काळीज काढून देणं !

त्याचं बिचाऱ्याचं 
"आता मी कोणाला चिडवणार?" 
असं म्हणून हसतच रडणं 
अन रडतच हसणं !

चित्रकार - रेणुका 

Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts