Saturday, 14 April 2018

अहो !

अहो अहो म्हणायचे दिवस गेले आता
सहा वर्ष पूर्ण झालीत कि लग्नाला ,

कसा संसार केला सोबत आपण देवंच जाणे
कित्येक वेळा तर भांडणांचा पुरंच आला !

पण हात  हातात घट्ट होते
मनाला प्रेमाचे कुंपण दाट होते.
म्हणून सर्व निभावून नेले
कित्येक पुरांना वाट देउन गेले
अन् आपल्या नात्याला विश्वासाची झाल्लर लावत आले

असं आपलं नातं अजुनच फुललं
जसं वसंत ऋतुत गुलमोहर बहरलं

Archana Sonagre. M.A. (Public Admin).

No comments:

Post a Comment