पोर्न ... एक जाळे आधुनिकीकरणाचे , उमलण्या आधीच कुस्करल्या जाणाऱ्या भावनांचे..

शीर्षक वाचून थोडे अचंबित झाले असतील सर्व. पण पडद्याआड लपवून ठेवलेले सगळे काही चव्हाट्यावर आणून ठेवले आहे ह्या आधनिकीकरणाने . मनात खूप वेळा यायचे ह्या विषयावर लिहायचे म्हणून. पण चार भिंतितल्या गोष्टीबद्दल  बोलायचं धारिष्ट्य होत नव्हते. पण काल दोन मैत्रीणींचा संवाद ऐकला अन वाटले पुरे आता हा लपवा छपविचा खेळ. व लिहायला बसले.
तर रोज सकाळी फिरायला जाणे माझे नित्याचेच . हनुमान मंदिराच्या ग्राऊंडला चार पाच फेऱ्या मारल्या कि थोडी विश्रांती म्हणून मंदिराच्या पारावर बसून ,कोवळ्या गवताला टिपल्यानंतर आकाशात उंच भरारी घेणाऱ्या चिमण्यांना न्याहाळत बसायचे. हा माझा आवडता छंद. तेव्हाही मि अशीच बसून होते. जवळच बाकावर बसलेल्या दोन तिशीतल्या तरुणींच्या संभाषणाने माझे कान सावध झाले. अन मि लक्ष देउन त्यांचा संवाद ऐकू लागले. तर  संभाषण सुरू होते ते नवऱ्याने मोबाईलमधे ठेवलेल्या पोर्न व्हिडिओबद्दल. अविवाहित तरुणीने विवाहित तरुणीला तिच्या नवऱ्याचे whats app बंद का आहे ? असा प्रश्न केला असता , विवाहितेने उत्तर दिले कि नवऱ्याच्या  whats app ग्रूपमधे काही मित्र सतत पोर्न व्हिडिओ पाठवायचे. म्हणून त्याने whats app  डिलीट केले. कारण ग्रूप exit केल्यावरही ते मित्र त्याला परत add करायचे.
अविवाहितेचा दुसरा प्रश्न ," त्याने delet केले कि तु करायला लावले ? "
" अग दोघांनी मिळवून ठरवले." विवाहीत उत्तरली .
त्यावर अविवाहित म्हणाली," त्यात काही गैर नाही. प्रत्येक पुरूष असो कि तरुण मुल, त्यांच्या ग्रूपमधे चालते ते (पोर्न शेअरिंग). मनोरंजन असते ते त्यांचे !"
" बारा तेरा वर्षे वय असलेल्या कोवळ्या मुलींसोबत शारीरिक संबंध बनवताना एखाद्या अधेड वयाच्या माणसाला पाहणे ह्यात कसले मनोरंजन ग !" विवाहितेने कळवळिने प्रश्न केला ," आज जी लैंगिक बाल गुन्हेगारी वाढली आहे ति कशामुळे ?"
निर्भया , कोपर्डी आणि असली कितीतरी प्रकरणे माझ्या डोक्यात गोंधळ घालू लागली. चिमण्यांचा एक थवा चिवचिव करीत माझ्या डोक्यावरुन गेला तशी मि भानावर आली. बघते तो त्या दोन्हीही मैत्रिणी आपापल्या घराच्या दिशेने जात होत्या.
मला विवाहितेचे म्हणणे खुपच पटले. खरेच आपण आजकाल असे चालतेच, असे होतेच.. असे म्हणून काय काय खपवून घेतोय. घरातील प्रत्येक माणसाजवळ मोबाईल असतो. समजा १२ - १३ वर्षाच्या मुलाच्या बाबाच्या मोबाईलमधे पोर्न व्हिडिओ असतील आणि मुलाने ते स्वतःच्या किंवा मित्राच्या मोबाईलवर पाठवून बघितले तर काय होइल ह्याचे उत्तर सर्वांना माहिती आहे. आणि हेही माहितीच असेल कि मुलांकडून आपण (मोठे) ज्या गोष्टी लपवतो त्याच त्यांना जाणुन घेण्यात जास्त उत्सुकता असते. (बि पि , बालक पालक बघितला असेलच). आता काही म्हणतील कि आमच्या मोबाईलला lock असते. मित्रांनो आपली मुलं किती हुशार आहेत ह्याची कल्पना असेलच सगळ्यांना. माझा साडे तिन वर्ष वयाचा मुलगा सहजपणे माझ्या मोबाईलचा पॅटर्न ओपन करून गाणी लावतो, फोटो पाहतो , गेम खेळतो अन सेटिंगपन चेंज करून ठेवतो. लॅपटॉप तर आमच्या डाव्या हाताचा खेळ. अशी मुलं दहाव्या वर्षी मोबाईलचा पासवर्ड शोधून काढतिल तर त्यात काही नवल नाही. आताची किशोरवयिन पिढी खूप हुशार आहे. म्हटले तर यशाच्या उत्तूंग शिखरावर पोहोचतील. पन तेवढीच अग्ग्रेसिव्ह आणि सहनशक्तीचा अभाव असलेली आहेत. (ते का ? त्यासाठी आपल्याला आपलाच अभ्यास करावा लागेल. त्याबद्दल लिहिनार सवडीने )
तर प्लिज आज , आतापासुन आपल्या मित्रांना / मैत्रिणींना पोर्न व्हिडिओ/ फोटो whats app किंवा यासारख्या इतर  networking साईटवर  शेअर करु नये असे सांगा. बर ह्यात कमीपणा वाटत असेल तर कमीत कमी तुम्ही तरी अशा पोस्ट इतरांना पाठवू नका.

माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेत . पोर्न व्हिडिओ पाहून मुलांना कसे वाटत असेल ? जि माहिती त्यांना सात्विकतेने मिळायला हवि , ति इतक्या चुकीच्या पध्दतीने मिळाल्यानंतर त्यांचे भावविश्व मोठ्यांबद्दल काय संदेश देत असेल? गोंधळलेल्या त्यांचे अभ्यासात मन लागत असेल का ? आधीची बालविवाह पध्दत योग्य होती का ? कि आताचं condom , I pills वापरून सगळं करून मोकळं राहणं ? कमी वयात गलेलठ्ठ पगार हातात येणाऱ्यान्ना रस्तोरस्तीचे दारिद्र्य का दिसत नाही ? बेडवर लोळत असले व्हिडिओ पाहत, शेअर करत बसल्यापेक्षा ते स्वतःच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी का काही करीत नाहीत ?


Written by Archana Sonagre Wasatkar (PGD in Counseling and Mental health ,M. A. In Public Admin, Master of labour studies)

Comments

Popular Posts