कोपर्डीच्या निमीत्ताने

घाबरवायचे नाही तुला
पण आता आणखी वाट पाहू नको .

आधी निर्भया आता कोपर्डी
यापुढे अजिबात सहनशीलता नको .

तुझ्या काळजाची वात ती
तुझ्या देहाचा भाग ती .
तिला बलवान कर ....
काढ ति अडगळीत ठेवलेली कट्यार.
तिला आजच धारदार कर .
आणि तुझ्या चिमुकलीच्या हातातले खेळणे कर .

थरकाप उडाला माझा ऐकून
कसे त्या मद्यधुंदान्नि मातीत तुडवले त्या कळिला . बस झाले पिलुला आपल्या कट्यार हाताळायला शिकव .

लहान असली तरीही तिला लेखु नकोस कमी. नाही पोहोचू शकत तिचे हात मुस्काटात द्यायला.
तर त्या नराधमांच्या लिंगावर वार करायला शिकव .

वाईट घडेल तिच्यासोबत काही ,
ह्या भीतीपोटी नको डांबून ठेउस घरात तिला . नाहीतर भित्रे समजून आपल्याला ,
कमी न करतील हे लांडगे घरात घुसून तिला ओरबडायला .
म्हणून सांगतेय लवकरात लवकर तिला कट्यार चालवायला शिकव ...

ह्या शंढांचे मनोबल खचनार नाही .
जोवर नाजूक कळ्या धारदार शस्त्राने
ह्यान्ना चिरनार नाहीत...
म्हणून लेखनी सारखेच
कट्यार हे शस्त्रही तिला चालवायला शिकव ...

बघ किती हास्यास्पद व्यथा,
सरकारने मोजली लाखात किम्मत त्या युवतीची . लाख असो वा कोटी,
त्या पैशाने खरेच परतेल का तो जीव,
कमी होतील का तिला दिलेल्या यातना!!!!
म्हणून सांगते पुरे झाले, नकोस आणखी वाट पाहू.
स्वरक्षणात तिला निपुण कर बघू...


Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts