Saturday, 9 April 2016

सोन्याच्या पिंजऱ्यातिल राजकुमारी

प्रत्येक मुलीचे स्वप्न असते कि तिला पती म्हणून एक राजकुमार मिळावा. जो तिचे सर्व हट्ट पूर्ण करेल. तिच्या भावनांना जपेल . तिच्यावर खूप प्रेम करेल. कशाचिच कमतरता पडु देणार नाही. माझ्या शेजारच्या तिलाही असाच राजकुमार मिळाला होता. खूप आनंदात होति ती . पण दिवसेंदिवस तिची तऱ्हा दुखद दिसु लागली. डोळ्यांभोवती मोठ मोठी काळी वर्तुळ तर अंशु साठी रात्र रात्र जागुनहि माझ्या चेहऱ्यावर उमटली नव्हती. मग हिला कय झाले म्हणून मला कुतूहल वाटायचे. पण नौकरी करत असल्यामुळे हाय हॅलो पेक्षा जास्त आमचा संबंध येइना . अशातच पाठीच्या त्रासामुळे मि नौकरीला राम राम ठोकला आणि आई कडे येउन सरकारी नौकरीसाठी प्रयत्न करुया म्हणून क्लासेस लावले.
        होळी निमित्त पुण्याला गेले तो यावेळी पहिल्यांदा आमच्या शेजारच्या तिने मला बसायला बोलावले. अंशुमुळे माझे जाने नाही झाले. दोन दिवसांनी तिने परत बोलावले. माझि नागपूरला परतायचि वेळ झाली होती. म्हटले भेटुन घ्यावे जायच्या आधी. त्यांचे लग्न झाल्यावर पहिल्यांदा त्या घरात मि पाय ठेवला होता. सर्व वस्तुन्नि सुसज्ज घर . वाटले चार वर्ष होतिल एप्रिलमधे आपल्या लग्नाला तरीही असा ताल आपल्या घराचा कि कालच लग्न झाले असे वाटेल. मि सहज विचारले ,'' काय करतेस दिवसभर?'' मला वाटले तरूण मुलगी आहे. काही क्लास वगैरे करत असेल .
''टिव्ही पाहते '', तिने अगदी सहजपणे उत्तर दिले.
''इतका टिव्ही... वेडी  होशील तु..'' मी आपलं आवेशात येउन म्हटले
''त्यात काय. अर्धी वेडी तर झालिच आहे मि .'' तिचे डोळे भरुन आले होते . मला उगीच बोलल्यासारख वाटलं . ''अरे मला तसे म्हणायचे नव्हते.''
''नाही हो मला नाही करमत घरात. पुण्याचा कानाकोपरा माहितेय मला तरीही एकटे कुठे जायचि परवानगी नाही. युनिक अकॅडमीमध्ये ५० हजार भरून ६ महिने M. P. S. C. चा क्लास लावला होता मि . P. S. I. चि प्रिलिम पास झाली आहे. पण लग्न झाले अन सगळे गेले.''
''असे नको बोलु . जवळपास लायब्ररी बघ आणि लायब्ररीत जात जा अभ्यासाला.''
''ताइ ते म्हणतात दिवसभर एकटिच असतेस घरी . मग कशा ला हवि लायब्ररी. पण घरि खूप एकटे वाटते. इच्छाच नाहि होत पुस्तक पकडायची. मग बसते टीव्ही लावुन. तुम्ही ह्यांच्या देखत एकदा सहज म्हणा ना मला,दिवसभर घरात काय करते म्हणून?''
''अग त्याला  नाही आवडले तर?''
''काही वाईट नाही वाटणार त्यांना. तसे ते खूप चांगले आहेत. माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतात.''
मग तिने मला तिच्याजवळ असलेली ४ मंगळसूत्र, ७ कानातल्यांचे जोड , आकोडा , नथ , हार , बांगडया दाखवल्या. सर्व त्याने स्वतः तिच्या पसंतिने घेउन दिलेले. ते पाहुन मला थोडा हेवा वाटला खरा. पण लगेच मन म्हणाले काय हेवा करतेस अर्चु ? ह्या सर्वांची किंम्मत तिचे स्वातंत्र्य आहे . खरेच कि ते सर्व वैभव असूनही ति अस्वस्थ होती. अगदी पिंजऱ्यातिल कैद्यासारखि . हो पण हा पिंजरा सोन्याचा होता अन ति त्यातिल राजकुमारी. तिला तिच्या आवडीचे सगळेच मिळत होते पण त्याच्या अस्तित्वापुढे तिच्या अस्तित्वाला , तिच्या धैय्याला काहीच किम्मत नव्हती. त्याने व्यवस्थितपने तिला आपल्यात अडकवले होते. ति सर्वगुण संप्पन्न आहे असे घरच्या लोकांना सांगुन तिच्याशी लग्न केले . गम्मत म्हणजे तिला निट पोळ्यासुद्धा करता येत नव्हत्या. अशात पहिल्या दिवसापासून सासूचि उनि दुनि ऐकने तिच्या नशिबी आले. तो जायचा कामावर अन हि घरात कुढत बसायची. उदासिनता तिच्यावर हावि झालिय . परिणामी तिच्या पोटावर आवश्यकते पेक्षा जास्त चरबि आलिय . ज्यामुळे मुल राहत नाहीये. तिची व्यथा कि ति कशाचिच complaint करु नाही शकत . कारण (समाजानुसार) तिला कशाचिच कमतरता नाहीये.
''ताइ मनात सारखे येते कि नवरा तर बारावी पास झाल्यावरहि मिळालाच असता मला. मग एवढे शिक्षण एवढी उठाठेव का केली मि .''
आता कसे सांगावे तिला कि उच्चशिक्षित बायको करणे हे सध्या फॅशनमधे आहे.
riter, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

No comments:

Post a Comment