शिक्षक दिन 2

आज तेरा वर्ष झालित शाळा सोडुन पण आजही ति शाळा , ते पटांगण खुप आपलेसे वाटते . लग्नाआधि दर प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाला झेंडावंदनासाठी शाळेत हजेरि लावायचे . आता ते शक्य नाही म्हणुन मग जेव्हा केव्हा कोराडिला जाते तेव्हा माझ्या प्रिय (तिथे असतान्ना अप्रिय होति ते वेगळे ) विद्या मंदिर शाळेत एक चक्कर नक्कि मारते. आणि आठवते ति धमाल , मौज मजा मस्ति आणि शिक्षकांची उडवलेलि टिंगल . आमच्या वर्गाचे नाव होते 'क ', म्हणजे तिसर्या दर्जाचा वर्ग ! सगळि उनाड मंडळी आमच्याच वर्गात अवतरली होति . पाचवि ते दहावि पर्यंत सर्वच शिक्षकान्ना रडवले आम्हि . मुलांचे तर जाउ द्या पण मुलिही काही कमि नव्हत्या . आता वाइट वाटते पण तेव्हा खरच खुप मजा यायची. तर आज आत्ता ह्या क्षणि मि माझ्या सर्व शिक्षकान्ना मनापासुन माफी मागते .
            सर्वप्रथम आम्ही सर्वात जास्त त्रास ज्या सरान्ना दिला, ते चरडे सर ! क्षमा असावि . चरडे सर आम्हाला गणित विषय शिकवायचे . वरुन कणखरपणा दाखवायचे पण आतुन अगदिच हळवे होते. लगेच भावुक व्हायचे . त्यामुळे त्यान्ना चिडवायला जास्तच मजा यायचि. "एक तलवार घ्या आणि माझि कापा मला ." हे त्यांचे ब्रिद वाक्य होते. आम्हि अगदि गम्भिरपणे त्यान्ना sorry म्हणायचो . आणि पुढल्या वर्गाला परत तेच सर्व व्हायचे.
             दुसर्या क्रमांकावर आहेत इंग्रजी विषय शिकवणार्या सांगोले मॅडम ! अंगकाठिने बारिक , सावळ्या अन थोड्या बुटक्या अशा ह्या मॅडम खुप कडक . म्हणुन जरा रागच करायचो त्यांचा. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यान्ना सर्वच मुल मुली घेरुन टाकायचो आणि खोड्या करायचो . कुणी केस ओढायचो तर कुणि वेगवेगळे आवाज काढायचो . त्या खुप चिडायच्या आणि ओरडायच्या . पण आमच्या गलक्यात त्यांच्या बारिक आवाजाला कुणिच दाद द्यायचे नाही. sorry mam !
              तिसरा क्रमांक लागतो आठवि ते दहावि आमच्या वर्ग शिक्षिका असलेल्या कुलकर्णि मॅडम ! खुप चांगल्या आणि प्रेमळ शिक्षिका . आम्हाला आवडायच्या त्या पण आमचा खोडकरपणा काहि केल्या चुप बसेना . त्यात एखाद्या मुलिला किंवा मुलाला मधातच चिडवन्यात , पत्र पाठवण्यात , रुमाल नाहितर खडु ,पेन फेकुन मारायचे व सम्पुर्ण विद्यार्थ्यान्ना दुर्लक्षित करायचे . असे प्रकार होत. मग मॅडम एकेकाला समोर येवुन कोम्बडा बनायला सांगायच्या . मग आंखोहि आंखोमे इशारे व्हायचे अन एकेक करुन अर्ध्या पेक्षा जास्त विद्यार्थि कोम्बडे बनायचे.
             
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts