मन चिंब पावसाळी

वाटलं होतं हा श्रावण असाच जाईल ,
उन्हाने कोरड पडलेल्या मनाला कोरडाच ठेवून जाईल ,
कविंना प्रेमगीत लिहायला शब्द सापडणार नाही ,
चिंब भिजलेला शृंगार आमच्या वाटेला येणार नाही ,
तो ओला  स्पर्श आता अनुभवता येनार नाही ,
ओथंबून आलेले घन नजरेस पडणार नाही ,
त्यांच्याशिवाय मोरंही आपला पिसारा उघडून नाचणार नाही ,
मग मोर पिसं जमा करायला आमची टोळी जमणार नाही ,
दरवर्षी जमते तशी आमची मैफिल जमणार नाही ,
असं करता करता किती किती अन काय काय होणार नाही असं वाटलं होतं ,
पण श्रावणाच्या मुखावरच तू आलास ,
मन चिंब पावसाळी करू लागलास ,
मन चिंब पावसाळी करू लागलास .
  Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts