जगून घ्यावे

बापरे ! किती दिवसांनी आज पुन्हा लिहितेय . अथर्व झाला तेव्हापासून अगदी रमलेच त्याच्यात .
                                जगून घ्यावे म्हटले सान्निध्यात बाळाच्या ,
                                हसून घ्यावे आज त्याला हसतांना बघतांना ,
                                पुन्हा भेटतील  का हे क्षण अनुभवायला ,
                                पुन्हा भेटतील का त्याचे बोबडे बोल ऐकायला ,
त्याचे लाड करायला दिवस रात्र अपुरे पडतेय ,
इतके बघते त्याला तरीही डोळ्यांची तहान वाढतेय ,
जसे काही नव्याने मीच मोठी होतेय ,
त्याचे रांगणेहि एक अप्रूप देतेय ………

जीव तर अजूनही निघत नाही अथर्व मधून पण पुढील प्रगतीसाठी त्याला घरी आईजवळ ठेवून बाहेर पडावेच लागते . शेवटी माझ्या स्व लाही मला जपावेच लागेल ना . हो ना सर्वांनाच जपावे लागते आणि त्यात स्वतःची ओळखही ठेवावी लागते . आज जसा वेळ मिळाला आधी ,'माझी रचना ' ला एक रचना द्यावी म्हटले . आशा करते तुम्हाला हि छोटीशी रचना नक्कीच आवडेल .
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts