शिक्षक दिन !

आज ५ सप्टेंबर , म्हणजे शिक्षक दिन ! पण कितवा शिक्षक दिन? असं सहजच मनात आलं . मग काय मारली इतिहासात उडी . तेव्हा कळलं कि आपल्या देशात शिक्षक दिन हा ५ सप्टेंबर १९६२ पासून साजरा केल्या जातो . म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या वाढदिवसाची हि तिथी आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करतो . खरे पाहता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांचे मित्र आणि विद्यार्थी मंडळ त्यांचा वाढदिवस साजरा करू इच्छित होते . त्यांनी आपला प्रस्ताव डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन समोर ठेवला तेव्हा डॉक्टर म्हणाले माझा वाढदिवस म्हणून हि तिथी साजरी केल्यापेक्षा ,'शिक्षक दिन' म्हणून साजरी करावी . त्यांचा हा प्रस्ताव सर्वांना पटला  आणि तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून ओळखला जातो . ह्याचा अर्थ ह्यावर्षी आपण ५० वा शिक्षक दिन साजरा करतोय .
प्रत्येक शाळेत , महाविद्यालयात शिक्षक दिन अतिशय उत्साहाने पार पाडला जातो . महाविद्यालयात गेल्यावर इतका इंटरेस्ट कधी घेतला नाही ह्या कार्यक्रमात . पण शाळेत असतांना  खूप धमाल केलीय आम्ही . आमचं ठरलेलं असायचं , शिक्षक दिन म्हणजे सर्व शिक्षकांना आराम . मग दिवसभराचे तास आम्ही सर्व विद्यार्थी वाटून घ्यायचो . पंधरा दिवसांआधीच कोण काय करेल हे ठरून जायचे . योग्यते प्रमाणे विषय निवडले जायचे . ज्यांना शिक्षक पद मिडले नाही त्यांना लिपिक, चपराशी अशी पद मिळायची . अगदी हेडमास्तर पासून ते चपराशी पर्यंत सर्वच विद्यार्थी बनायचे आणि विद्यार्थी शाळा चालवायचे . छोट्या छोट्या मुली जेव्हा साडी घालून , डोळ्यावर चष्मा लावून वर्गात आपल्या शिक्षकाची नकल  करत शिकवायच्या आणि मुलं आपल्या नकली मिशांवर हात फिरवत  तेव्हा धमाल मजा येत होती त्या दिवशी . खूप गोंधळ उडायचा पण आमच्या शिक्षकांनी नेहमीच आमच्यावर विश्वास ठेवला . आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक वर्षी उत्साहाने 'शिक्षक दिन' साजरा करायचो .
आज ते सर्व आठवून पुन्हा शाळेत जायचं मन होतेय . पुन्हा एकदा त्या शिक्षकांना भेटावसं वाटतेय . पुन्हा एकदा त्यांची नकळ करावीशी वाटतेय . पुन्हा एकदा त्या वाटेवर जावसं वाटतेय . पण आता ते शिक्षकही नाहीत कि तशा शाळाही नाहीत . सर्व काही कसं यंत्रवत झालेय . कदाचित हि प्रगती आहे . पण मला ती योग्य वाटत नाही . असो , माझा मझ्या आयुष्यात आतापर्यंत आलेल्या सर्व शिक्षकांना आणि ज्यांच्याकडून मला कडी मात्र हि शिकायला भेटले त्या सर्वांना साष्टांग नमस्कार!

Comments

Post a Comment

Popular Posts