सरींवर सरी

सरींवर सरी कोसळून राहिल्या अन माझी अजून एकही कविता इथे नाही. झालेच कसे?? सॉरी उशीर केल्याबद्दल. मग घ्या एक 'सर' पावसाची,, गारठवणारी माझ्या कडून.

सरींवर सरी जमिनीवर धावुनी आल्या,
जेव्हा गगनी विजा गाणी गाऊ लागल्या ...

सरिता पुराने वाहू लागल्या ,
जेव्हा मेघांच्या सभा भरल्या ...

ओल्या मातीचा सुगंध नसानसात भिनला ,
जेव्हा पावसाचा थेंब थेंब तिच्यात मुरला ...

पावसाचे मोल शेतकरी  सांगता झाला ,
जेव्हा त्याचा घाम अंकुर रूपाने जन्मला ...

कवयित्री : अर्चना 

Comments

Popular Posts